• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 23, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

जळगाव, 23 फेब्रुवारी: जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत केंद्रिय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केद्र सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या व सुरु असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी खासदार स्मिता वाघ,  महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,  मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपवनसंरक्षक जमीर शेख, राम धोत्रे तसेच भुसावळ , रावेर, नशिरबाद, फैसपुर, वरणगावचे नगराध्यक्ष उपस्थित होते.

रक्षा खडसेंनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा –

केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी रेल्वे विभागाच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजने अंतर्गत प्रस्तावित कामांसदर्भात सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता समन्वयाने कामे पुर्ण करावीत, त्यांच्या अडचणी समजून घेऊन ठरवून दिलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्याच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना  दिल्या.

या बैठकीत मध्य रेल्वे विभागातर्फे जिल्ह्यात  सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली. अमृत भारत, वन स्टेशन-वन प्रोडक्ट, आदी महत्वाच्या प्रकल्पाच्या कामांचा यावेळी आढावा त्यांनी घेतला. सुरक्षिततेचे निकष पाळणे गरजेचे असून  स्थानिक परिस्थितीचा विचार करून कामे पूर्ण करावीत, काही ठिकाणी रेल्वे पुलांच्या जॉईंट एलिमेंट्सच्या दुरुस्तीबाबतही सूचना  त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना  दिल्यात. बैठकीत रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ प्राधिकरण, महावितरण, जलजीवन मिशन,  ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, कृषी, आरोग्य व शिक्षण विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी घेतला.

केंद्र व राज्य सरकारच्या निधीतील सहभाग लक्षात घेता विविध योजनांच्या कामासंदर्भात जिल्ह्यातील खासदारांसमवेत चर्चा करण्यात यावी. तसेच कामांच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार व आमदार दोघांनाही प्रोटोकॉलनुसार निमंत्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कामांचे प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अहवाल तयार करावा, जेणेकरून समन्वयातून कामे वेळेत पुर्ण होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव विमानतळ विस्तारीकरणासंदर्भातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या विविध विकासकामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीत विकासकामांच्या गतीसाठी समन्वय, पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीला सर्व संबधित विभागांचे प्रमुख, तहसिलदार, नगर पालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: ‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

बातमी शेअर करा !
Share
Tags: dishadistrict development coordination and monitoring committeejalgaon newsmos raksha khadsesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

Jalgaon News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

February 23, 2026
‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

February 23, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन, नेमकं काय आहे ‘हे’ अ‍ॅप?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन, नेमकं काय आहे ‘हे’ अ‍ॅप?

February 23, 2026
जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 23, 2026
कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

February 22, 2026
भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

February 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page