लासगाव, (पाचोरा प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे ईद व गुढीपाडवा मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उद्या सोमवारी 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडणार आहे.
लासगावात ईद व गुढीपाडवा मिलन कार्यक्रम –
लासगावातील तरंग बहुउद्देशीय संस्था, मुस्लिम बांधव व ग्रामस्थांच्यावतीने या ईद व गुढीपाडवा मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लासगाव ग्रामपंचायतीजवळ उद्या सोमवार 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी बांबरूड-कुरंगी गटातील जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, आदींची उपस्थिती असणार आहे.
ईद हा प्रेम, बंधुत्व आणि त्यागाचा संदेश देणारा सण आहे. तर गुढीपाडवा हा सण हिंदु नववर्षाचे स्वागत करणारा, नवे संकल्प घेणारा तसेच आनंदाचे प्रतीक आहे. यानिमित्त सामाजिक स्नेह वृध्दिंगत करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे, असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.