• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात डोळे येण्याची साथ रूग्णसंख्येत होतेय वाढ, बचावासाठी प्रशासनाने केले ‘हे’ आवाहन 

जळगाव जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने डोळे येण्याच्या साथीत रूग्णवाढ होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 10, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर
जळगाव जिल्ह्यात डोळे येण्याची साथ रूग्णसंख्येत होतेय वाढ, बचावासाठी प्रशासनाने केले ‘हे’ आवाहन 

जळगाव, 10 ऑगस्ट : जिल्ह्यात कंजक्टिव्हायटीस हा डोळ्यांचा संसर्गजन्य रोग बळावला आहे. याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे व स्वतःच्या डोळ्यांची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

जिल्हा प्रशासनाचे आवाहन –

कंजक्टिव्हायटीस हा विषाणूजन्य संसर्ग रोग आहे. डोळयांचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो वायरस मुळे होतो. जो विशेषतः पावसाळ्यात होतो.  कधी कधी दोन्ही डोळयांवर त्याचा संसर्ग होतो. डोळे येणे हा सौम्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग असला तरी देखील याबाबत सर्व विभागाने दक्ष रहाणे आणि जनतेने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.

 

कंजक्टिव्हायटीस आजाराची लक्षणे –

डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना खाज येणे चिकटपण येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लालसर होणे डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

 

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी-

डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवावे, रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादी स्वतंत्र ठेवावेत.  इतर व्यक्तीच्या रुमाल टॉवलने डोळे पुसू नयेत. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्याचा वापर करावा. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळयांची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्यानुसारच औषधी डोळयात टाकावीत. डोळयातून पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षण आढळतात अशा व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करणे तसेच  नियमित हात धुणे आवश्यक आहे.  एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो, त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

 

आरोग्य विभागाच्या उपाययोजना –

वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत बाह्य रुग्ण स्तरावर रुग्णाची तपासणी व उपचार, समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविकांच्या मदतीने घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आवश्यकता असल्यास रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात येते, शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, वसतिगृह, इ. ठिकाणी भेटी देऊन मुलांची तपासणी करण्यात येत आहे, आरोग्य शिक्षण व जनजागृती करणे सुरु आहे. RBSK पथकामार्फत शाळांमध्ये दैनदिन रुग्ण तपासणी करण्यात येत आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Adeno virusConjunctivitiseye infectionॲडिनो वायरसकंजक्टिव्हायटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

April 6, 2026
जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

जेष्ठ नेते शरद पवार सलग तिसऱ्यांदा राज्यसभेत; महाराष्ट्रातील 7 खासदारांनी घेतली शपथ

April 6, 2026
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची विकास कामे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींची विकास कामे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 6, 2026
मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये ‘या’ चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया

मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत जळगावमध्ये ‘या’ चार क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू निवड प्रक्रिया

April 6, 2026
वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 5, 2026
पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

April 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page