चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दुसरा दिवस होता. दरम्यान, आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सरकारकडून 10 व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये युवक-महिला तसेच शेतकऱ्यांसदर्भात अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बील माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ –
महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सरकारकडून घोषणांचा पाऊस पडला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील 44 लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची देखील माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार –
शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असून यासाठी सरकार मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळे 7.5 एचपी मोटर्स असलेल्या छोट्या, मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज देणार देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरऊर्जा करून करण्याचा 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा : मोठी बातमी, मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण! अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा