अमळनेर, 21 फेब्रुवारी : अमळनेर येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात मद्यसेवन केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. दरम्यान, याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे.
प्रशासनाने केली निलंबनाची कारवाई –
अग्निशमन दलाच्या कार्यालयात मद्यसेवन केल्याने दलाचे प्रमुख नितीन खैरनार यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचा कार्यालयात मद्यसेवन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. परेश रवींद्र उदेवाल याने अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन खैरनार यांचा कार्यालयात मद्य प्राशन केल्याचा व्हिडीओ बनवून याबाबतची तक्रार केली होती.
दरम्यान, अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवला होता. मात्र, समाधानकारक उत्तर देता न आल्याने मुख्याधिकाऱ्यांनी खैरनार यांना निलंबित केल्याचे आदेश दिले आहेत.
काय संपूर्ण प्रकरण? –
अमळनेरच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी नितीन खैरनार कार्यालयात दारु पित असताना दिसत असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे व्हिडीओ बनवणाऱ्याला तुला करायचं ते कर, असं आव्हानदेखील खैरनार यांनी दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या प्रकरणी नितीन खैरनार यांना निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय,’ मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?