मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 13 मे : चोपड्यात मानवसेवा तीर्थ बेवारस मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसन केंद्र येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त 12 मे रोजी नेहमी उपचारासाठी आणि सेवा देण्यासाठी तत्पर असलेल्या अधिपरिचारिका यांनी अन्नदान देवून एक आगळवेगळा परिचारिका दिन साजरा केला.
अधिपरिचारिका मंगल धमके यांच्यातर्फे अन्नदान –
आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त सेवाभावी वृत्ती ठेवून मानवसेवा तीर्थ बेवारस मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसन केंद्र चोपडा येथे नेहमी उपचारासाठी आणि सेवा देण्यासाठी तत्पर असलेल्या उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथील अधिपरिचारिका मंगल धमके यांनी अन्नदान देवून एक आगळवेगळा परिचारिका दिन साजरा केला.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा –
जगातील आधुनिक परिचारिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटली येथे अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. फ्लॉरेन्स नाइटिंगल यांची सेवाभावी वृत्ती असल्यानी त्यांनी घरच्यांचा विरोध असूनही स्वतः नर्सिंग ट्रेनिंग घेतलं. दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेल्या रुग्णांची सेवा केली. कुठलीही अपेक्षा न करता त्यांनी रुग्णांची हातात दिवा घेवून अहोरात्र सेवा केली. त्यामुळे त्यांना ‘लेडी विथ द लँप’ असे संबोधले जाऊ लागले.
पुढे त्यांनी नर्सिंग ट्रेनिंग घेण्यासाठी महिलांना तयार करून त्यांना ट्रेनिंग दिले जेणेकरून गरजू रुग्णांना आरोग्याची मदत मिळेल तेव्हापासून नर्सिंग ट्रेनिंगची सुरुवात झाली आणि त्यांची आठवण म्हणून 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरम्यान, जागतिक परिचारिका दिनानिमित्त फ्लॉरेन्स नाइटिंगल यांच्या महान कार्याला सलाम करते आणि मला या क्षेत्रात रुग्ण सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे चोपडा येथील अधिपरिचारिका मंगल धमके यांनी सांगितले.