• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 5, 2026
in चाळीसगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

जळगाव, 5 मार्च: जळगाव लोकसभेचे माजी खासदार तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेश पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, या चर्चांवर अखेर आता स्पष्ठता आली असून उद्या 6 मार्च रोजी उन्मेश पाटील आणि त्यांचे काही समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती उन्मेश पाटील यांच्या समाजमाध्यमावरील अकाऊंटवरून देण्यात आली आहे.

उद्या मुंबईत पक्षप्रवेश –

जळगाव जिल्ह्यातील काही आजी-माजी जिल्हा पदाधिकारी, तालुका स्तरावरील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांकडून उन्मेश पाटील यांच्या निर्णयाला पाठिंबा देणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी 6 मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या या प्रवेश सोहळ्यात उन्मेश पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील नेमकं कोण-कोणं पक्षप्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेत केला होता पक्षप्रवेश –

माजी खासदार उन्मेश पाटील यांनी 2014 ते 2019 च्या काळात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, 2019 साली ते पहिल्यांदाच जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले. यानंतर 2024 साली पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी ते इच्छुक असताना त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली. उन्मेश पाटील यांच्याऐवजी 2019 साली स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली.

भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी करण पाटील-पवार यांना जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र, स्मिता वाघ यांनी करण पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

यानंतर उन्मेश पाटील हे सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप करत जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत राहिले. दरम्यान, मागील काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक तसेच महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित असे यश मिळावता आले नाही. असे असताना त्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडत शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

हेही वाचा: युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: former mp unmesh patiljalgoan politicsmarathi newsshivsena shinde groupShivsena UBTsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
VIDEO | राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मुद्दा उपस्थित

VIDEO | राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मुद्दा उपस्थित

March 5, 2026
हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

March 4, 2026
Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

March 4, 2026
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page