उंदिरखेडे (पारोळा), 14 फेब्रुवारी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव उंदिरखेडे येथे आयोजित करण्यात आले आहे.
स्रियांची मोफत आरोग्य तपासणी –
शिबिराच्या चौथ्या दिवशी आई हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने उंडिरखेडे येथील स्त्रियांसाठी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. ह्या शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य रोहन सतीश पाटील यांनी केले. यावेळी आई हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली नेरकर ह्यांनी 165 स्त्रियांची आरोग्य तपासणी केली.
दरम्यान, या रोगनिदान शिबिरामध्ये नागरिकांना अनेक सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सोनोग्राफी, रक्त तपासणी आणि इतर वैद्यकीय सुविधा आणि मार्गदर्शन केले जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र पाटील ह्यांनी सांगितले. या आरोग्य शिबिरासाठी प्रा. काकासाहेब गायकवाड, डॉ. किरण पाटील, लोकेश पवार, माधव पारधी आणि शिबिरातील स्वयंसेवक उपस्थित होते.
हेही वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगे यांची आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी प्रकृती खालावली