चाळीसगाव, 22 ऑक्टोबर : चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे काल मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. दरम्यान, आज राजीव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यात आला असून चाळीसगावात हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निधनानंतर आज चाळीसगाव शहरात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर उसळला होता. त्यांच्या राजगड बंगल्याबाहेर हजारो नागरिकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, राजीव देशमुख यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याच्या भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
राजीव देशमुखांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील, आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतिश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आजी-माजी आमदार उपस्थित होते.
हेही वाचा : मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी; दोन गावे घेतली दत्तक






