• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षिस वितरण व शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षिस वितरण व शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 25 जानेवारी : पाचोऱ्यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षिस वितरण व शिक्षकांचा सन्मान सोहळा आज 25 जानेवारी रोजी पार पडला. शहरातील कै.आर.ओ.तात्या पाटील व्यापारी भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यासोबतच, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले यांनी स्पर्धा परिक्षा करणाऱ्या तरूणांना महत्वाच्या बाबी सांगत करिअरबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनेक यशस्वी तरूणांच्या संघर्षमय गोष्टी सांगून उपस्थितांच्या मनात प्रेरणा निर्माण केली.

 

आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्पर्धा परिक्षा घेण्यात आली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने यश प्राप्त करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पाच वर्षांपासूनच्या मुलापासून ते अगदी विवाहित महिला बघिनींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. लहान मुलांमध्ये देखील आतापासून स्पर्धा परिक्षेत सहभागी होण्याची इच्छा यामाध्यमातून दिसून आली.

यासोबतच, एखादी विवाहित बघिनी की ती आपला संसार थाटत असताना मी काहीतरी करावं, अशी एक जिद्द उराशी बाळगून या सामान्य स्पर्धेत सहभागी झाली. यामुळे स्पर्धेतील विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करत असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले.

या कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थित तरूणांना आगामी करिअरबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच शहरात असलेल्या अत्याधुनिक वाचनालयातील सुविधा वाढवण्यासाठी राजेंद्र चिंचोले तसेच नगरपरिषदेचे शिक्षण सभापती प्रविण ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती तयार प्रयत्न केला जाईल. दरम्यान, पाचोरा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वाचनालयाच्या तळभागात येत्या काळात सुसज्ज व्यायामशाळा (जीम) उभारणार असल्याचे सांगितले. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांच्या काही सूचना असतील तर त्यांनी आम्हाला याबाबत माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

पाचोऱ्यातील खेळाडूंचा सन्मान –

थायलंडमधील बँकॉक येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल पहिलवान हितेश पाटील याचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, येत्या काळात हितेश पाटीलला सरकार नोकरी मिळवून देण्यासाठी तालुक्याचा आमदार म्हणून प्रयत्नशील राहणार असल्याचे किशोर आप्पा पाटील म्हणाले. यासोबतच, पाचोऱ्यातील क्रीडा शिक्षक आणि बास्केटबॉल प्रशिक्षक जावेद शेख यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचा देखील सन्मान करत त्यांच्या खेळाबद्दल कौतुक केले.

याप्रसंगी गट शिक्षणअधिकारी विजय पवार, पाचोरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नगरसेवक गणेश पाटील, नगरसेवक प्रविण ब्राम्हणे, वाल्मिक पाटील, अरूण पाटील, राजेंद्र पाटील, विनोद तावडे, स्वीय सहायक राजेश पाटील यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते, तसेच स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले.

Video | थायलंडमध्ये इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचोऱ्याचा सुपुत्र हितेश पाटीलने पटकावलं सुवर्णपदक | विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: general knowledge competitionhindu hriday samrat balasaheb thackeraymla kishor appa patilpachora latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page