ईसा तडवी
लोहारा/पाचोरा, 4 डिसेंबर : पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील त्या काळी असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल लोहारा (आताच्या डॉ.जे.जी. पंडित, मा. वि. लोहारा) या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हा तब्बल 36 वर्षांनी लोहारा येथील तीर्थक्षेत्र श्री. तपेश्वर महाराज मंदिराजवळ करण्यात आला.
यावेळी 1987-88 वर्षातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी व मित्र-मैत्रिणीनी शाळेतील गुरुजनाबाबत कृतज्ञता व्यक्त करीत मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्यध्यापक अ. अ. पटेल, इ. एन. सावदेकर, जी. एल. सरोदे, वाय. बी.पाटील हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय गुरुजनांना व वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शाळेची नियमित प्रार्थना” खरा तो एकचि धर्म–जगाला प्रेम अर्पावे..” या प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी गुरुजनांच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच दहावीच्या वर्गात शिक्षक असलेले इ. एन. सावदेकर,पटेल, सरोदे, वाय. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले. या शाळेतील माजी विद्यार्थी सध्या विविध पदावर कार्यरत असून, यांच्या भेटीने खूप आनंद झाला, असे मान्यवरांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाला उपस्थिती सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, टोपी व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले, तर उपस्थिततांचे आभार क्रांती दिनकरराव शेळके यांनी मानले.
या कार्यक्रमाला सुरेश पंढरीनाथ निकुंभ,दिनेश सोनजी चौधरी, कैलास भिकन कासार, देविदास चिंतामण चौधरी, युवराज भगवान चौधरी, रविंद बळीराम चौधरी, विद्या भालचंद्र कुलकर्णी, छाया तुळशीराम जगताप, वैशाली भास्करराव निकुंभ, ललित विश्वनाथ पाटील, भाऊराव माधव आहिरे, जितेंद्र माधव पालीवाल, प्रवीण निकुंभ, पुष्पा दामोदर चौधरी, विवेक महाले, रवींद्र संभाजी पाटील, माधव शामराव पवार, नंदाताई देशमुख, प्रिती अर्जुन वाघ, सुरेश गवांदे, क्रांती दिनकरराव शेळके, मकराम मोहनसिंग राठोड, किसन मोहनसिंग राठोड, भास्कर कौतिक पाटील, वंदना पांडुरंग पाटील, अनिल बाबूलाल सुतार, ज्ञानेश्वर त्रंबक बोरशे, हीरालाल रामकृष्ण पाटील, अनिल काशिनाथ निकुंभ, अशोक सुरवाडे, शामराव प्रभाकर तायडे, सुनील नामदेव पाटील, संजय गोकुळ जगताप, किसन तुळशीराम पाटील, अमृत पंढरी पाटील-म्हसास, सुकलाल पंढरी राजपूत, दगडू चिंधु चौधरी, रामदास बळीराम कोळी, आदी उपस्थित होते.