संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 14 ऑगस्ट : पारोळा येथील ज्ञानदीप बहुउद्देशीय विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय सार्वे बाभळे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी जवानांसाठी ‘एक राखी विरो के नाम” या उपक्रमातून घरदार सोडून सीमेवर सेवा करणाऱ्या जवानांसाठी राख्या पाठवल्या. उत्तराखंड मधील “उत्तर काशी येथे रजिस्टर पोस्टाने रवाना करण्यात आले. या उपक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना तसंच इतरांना मदत करण्याची मानसिकता तयार होण्यास मदत होते.
विद्यार्थ्यांनी राख्या जवानांना पाठवल्या –
सीमेवर राख्या पाठवण्याच्या उपक्रम शाळा गेल्या पाच वर्षापासून करत आहे. त्यात पश्चिम बंगाल, मिझोराम, आसाम, जम्मू काश्म हिंदू धर्मात चार धाम यात्रेला फार महत्त्व आहे त्या माध्यमातून उत्तराखंडमध्ये दरवर्षी लाखो भक्त केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ’ या ठिकाणी जातात परंतु जमिनी पासून डोंगराळ भागात हा परिसर असल्याने तेथील वातावरण अतिशय थंड असल्याने तेथे अनियमित पावसाळा तसेच बर्फवृष्टी होत असते. त्यामुळे अनेक यात्रे करू संकटात सापडतात त्या भक्तांच्या मदतीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत असलले सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या व सैनिकाप्रति भावना व्यक्त करणारे पत्र पाकिटात ठेवून ते पाकीट सीमेवर जवानांना पोहोच करण्यात आले.
उत्तराखंडमध्ये राख्या पाठविल्या –
या उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षकांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे पाकीट शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी उत्तराखंडमध्ये राख्या पाठविल्या आहेत. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पवार यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थिनींना शालेय वस्तू रक्षाबंधन निमित्त भेट दिली जाणार आहेत. या उपक्रमाला शिक्षक दीपक पाटील, रंगराव साळुंखे, सचिन पाटील, बाळासाहेब निकुंभ, कविता सोनवणे, हरीश पाटील, मोनाली पाटील, शालिनी पाटील, नीलेश पाटील, मनोज श्रीगणेश, सुनील पाटील आदींचे सहकार्य लाभले.
हेही वाचा : “…तर लाडकी बहीण योजना रद्द करू”, सुप्रिम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले, काय आहे संपुर्ण बातमी?