पणजी, 7 सप्टेंबर : अलीकडील अतिवृष्टी व पुरामुळे छत्तीसगड आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेक कुटुंबे विस्थापित झाली असून घरांचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या वतीने तातडीची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री मदत निधीतून छत्तीसगड व पंजाबला प्रत्येकी 5 कोटी रुपयांची मदत दिली जाणार असून ही मदत बचावकार्य, मदतकार्य आणि पुनर्वसनासाठी वापरण्यात येईल.
“छत्तीसगड व पंजाबमधील बांधवांच्या वेदना आम्हालाही जाणवत आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आपत्तीग्रस्तांच्या उभारणीसाठी व त्यांना आधार देण्यासाठी ही मदत एक छोटासा प्रयत्न आहे, संकटाच्या प्रसंगी देश एकदिलाने उभा राहत असतो आणि गोवा नेहमीच आपली जबाबदारी निभावत राहील असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.