• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

हॉकी आशिया कप 2025 : भारताचा ऐतिहासिक विजय; आठ वर्षांनंतर पटकावलं जेतेपद, अंतिम सामन्यात कोरियाचा केला पराभव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 8, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
हॉकी आशिया कप 2025 : भारताचा ऐतिहासिक विजय; आठ वर्षांनंतर पटकावलं जेतेपद, अंतिम सामन्यात कोरियाचा केला पराभव

राजगीर (बिहार), 8 सप्टेंबर : बिहारमधील राजगीर येथे काल रविवारी 7 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या हॉकी आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विद्यमान विजेता दक्षिण कोरियाला 4-1 अशा फरकाने पराभूत केले. दरम्यान, या विजयासह भारताने आशिया कपचे विजेतेपद मिळवले असून हा संघाचा चौथा आशिया कप किताब ठरला आहे. विशेष म्हणजे भारताने आठ वर्षांनंतर हॉकी आशिया कप जिंकलाय.

‘…अन् भारतीय हॉकी संघाने विश्वचषकासाठी मिळवली पात्रता!’ –

कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या विजयासह पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवलीय. याआधी भारताने 2003, 2007 आणि 2017 मध्ये आशिया कपचे विजेतेपद मिळवले होते. विशेष म्हणजे 2007 आणि 2025 या दोन्ही वेळा भारताने कोरियाला पराभूत करूनच किताब जिंकला. यासोबतच भारतीय हॉकी संघ 1982, 1985, 1989, 1994 आणि 2013 मध्ये उपविजेता ठरला होता.

‘असा’ राहिला अंतिम सामना –

हॉकी आशिया कपच्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ दाखवला. पहिल्याच मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. आठव्या मिनिटाला जुगराज सिंगला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करता आला नाही, तरी पहिला क्वार्टर भारताने 1-0 ने जिंकला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने 27 व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. हाफ-टाइमपर्यंत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले. तसेच तिसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, सलग पेनल्टी कॉर्नर मिळूनही भारतीय बचावफळीसमोर त्यांची एक न चालली. उलट 44 व्या मिनिटाला दिलप्रीतनेच आपला दुसरा आणि भारताचा तिसरा गोल केला.

दरम्यान, शेवटच्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासने 49 व्या मिनिटाला अप्रतिम फील्ड गोल करून भारताची आघाडी 4-0 अशी केली. यानंतर लगेचच एका मिनिटाने कोरियाच्या डॅन सनने गोल करत फरक कमी केला; मात्र त्यानंतर भारतीय संघाने सामना पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवत 4-1 ने विजय निश्चित केला.

भारतीय हॉकी संघाची अंतिम सामन्यातील कामगिरी –

  • सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक खेळ दाखवला.
  • पहिल्याच मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करून आघाडी मिळवून दिली.
  • 27 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगचा गोल; हाफ-टाइमपर्यंत भारत 2-0 ने पुढे.
  • 44 व्या मिनिटाला दिलप्रीतचा दुसरा गोल, आघाडी 3-0.
  • 49 व्या मिनिटाला अमित रोहिदासने शानदार फील्ड गोल, भारत 4-0 ने आघाडीवर.
  • लगेचच कोरियाच्या डॅन सनने एक गोल केला; पण अखेर भारताने 4-1 ने विजय मिळवला.

भारताने चौथ्यांदा विजेतपद मिळवलं –

हॉकी आशिया कपच्या अंतिम सामन्यातील विजयामुळे भारताने चौथ्यांदा आशिया कप जिंकला आहे. याआधीचे तीन विजय अनुक्रमे 2003, 2007 आणि 2017 मध्ये मिळाले होते. दरम्यान, आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघ पुन्हा आशिया कपचा विजेता ठरला आहे.

आशिया कपमधील आतापर्यंतची भारतीय हॉकी संघाची कामगिरी :

  • विजेतेपद : 2003, 2007, 2017, 2025
  • उपविजेतेपद : 1982, 1985, 1989, 1994, 2013

हेही वाचा : ‘मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन, ते एक महान पंतप्रधान’; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य, PM मोदींनी काय प्रतिक्रिया दिली?

बातमी शेअर करा !
Share
Tags: Harmanpreet SinghHockey Asia Cup 2025Hockey World Cup 2026India vs Korea final matchIndia winsMarathi Sports Newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page