मुंबई, 3 जून : ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या निमित्ताने व्यापक चर्चेला उधाण आले आहे. आजवर भारतीय चित्रपटसृष्टीने क्वचितच हात घातला आहे, अशा विषयावरील या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या मार्मिक ‘टीझर’ने प्रेक्षक चकित झाले आहेत. उत्तर प्रदेशात घडणारी ‘हमारे बारह’ची कथा लोकसंख्या वाढीच्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालते आणि त्याच्या बहुआयामी परिणामांवर प्रकाशझोत टाकते.
चित्रपटाच्या टीमला मुख्यमंत्र्यांचे समर्थन –
अन्नू कपूर, मनोज जोशी आणि परितोष त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हमारे बारह’ या चित्रपटाने घोषणेपासूनच, धाडसी कथनामुळे आणि विचारांना चालना देणाऱ्या संकल्पनेमुळे सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘हमारे बारह’ चित्रपटाचे निर्माते आणि अन्नू कपूर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. चित्रपटाच्या टीमने मुख्यमंत्र्यांचे समर्थन लाभल्याबद्दल आणि पोलीस संरक्षण मिळाल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. चित्रपट प्रदर्शित होत असलेल्या सप्ताहादरम्यान मदत दिली जाईल, या आश्वासनाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
चित्रपटाची कथा सामाजिक प्रथांना आव्हान देणारी –
अन्नू कपूर, अश्विनी काळसेकर, मनोज जोशी, अभिमन्यू सिंग, पार्थ समथान, परितोष त्रिपाठी, अदिती भाटपाहरी आणि इश्लिन प्रसाद यांच्यासह अनेक उत्तम कलाकारांचा चमू असलेल्या या चित्रपटाच्या ‘टीझर’ने, हा चित्रपट दर्जेदार सिनेमॅटिक अनुभव देईल, याची जणू ग्वाही दिली आहे. अत्यंत मूलगामी कथन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली या चित्रपटाची कथा सामाजिक प्रथांना आव्हान देते आणि महत्त्वाच्या वास्तवांना संबोधित करते.
प्रतिष्ठित ७७व्या कान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर झालेला, ‘हमारे बारह’ हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवण्याकरता सज्ज झाला आहे. एका संवेदनशील विषयाकडे नव्याने पाहण्याचा या चित्रपटाचा दृष्टिकोन समकालीन चित्रपटातील त्याचे महत्त्व अधोरेखित करतो. रवी एस. गुप्ता, बिरेंदर भगत आणि संजय नागपाल यांनी या चित्रपटाची संयुक्तपणे निर्मिती केली असून, त्रिलोक नाथ प्रसाद सह-निर्माता आणि कमल चंद्रा दिग्दर्शक आहेत. ‘हमारे बारह’ चित्रपटाची पटकथा राजन अग्रवाल यांनी लिहिली आहे.
‘वायकॉम १८ स्टुडिओ’ या चित्रपटाचे देशभरातील वितरण हाताळणार आहेत, तर ‘रायझिंग स्टार एंटरटेनमेंट यूके’ यांनी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. चित्रपट निर्माते मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची तयारी करत असताना, ‘हमारे बारह’ हा केवळ सिनेमा बनवण्याचा करण्यात आलेला प्रयत्न आहे, असे नाही, तर सामाजिक मंथन घडवणारा आणि बदलाला हातभार लावणारा प्रयत्न ठरला आहे.
हेही वाचा : IAS दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयामोरच्या इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी?






