जळगाव, 12 एप्रिल : प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्यभरात बच्चू कडूंचा प्रहार संघटनेचा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यभरात प्रहारच्या वतीने सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात येत आहे. तसेच मंत्र्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असे बच्चू कडूंनी सांगितले होते. यावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कडूंवर जोरदार टीका केलीय.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगावात माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, मी रात्रभर वाटच पाहिली. मी रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या दरवाजासमोरच बसलो होतो. पोलीस आले होते, मी त्यांना सांगितलं की, तुम जाओ; आने दो प्रहार को. मात्र, कोणीच आलं नाही. दरम्यान, बच्चू भाऊ कच्चू हो गया, अशा खोचक शब्दात मंत्री पाटील यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केलीय.
View this post on Instagram
लाचप्रकरणी दोन पोलीस हवालदार निलंबित; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे राज्यभर आंदोलन –
महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होण्यासाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिलीय. तसेच सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या घराबाहेर प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांनी आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वतः बच्चू कडू हे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर थेट मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली आहे.