जळगाव, 28 जुलै : देशातील प्रसिद्ध वकील, जळगावचे सुपूत्र, पद्मश्री उज्ज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. त्यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच काल 27 जुलै रोजी जळगाव येथे आले. यानिमित्ताने काल सायंकाळी जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? –
कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सगळे मंत्री झाले होते. गिरीश भाऊ देखील मंत्री झाले होते. 2014 साली महायुतीचे सरकार आले त्यावेळी माझा मंत्रीमंडळात समावेश होईल. यावेळी केवळ राज्यमंत्री पद मिळेल असं वाटतं होतं. त्यावेळेस गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ हे मंत्री झाले. पण, मी काही मंत्री झालो नाही. दरम्यान, 2016 साली मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली. दोन राज्यमंत्री शिवसेनेकडून घ्यायचे आहेत, असा विषय सुरू झाला. गिरीश महाजन यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत विषय पोहोचवला. पण तुमचा पक्षाचा विषय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यानंतर मग जावं कुठे असा प्रश्न मला पडला.
…अन् मी सहकार राज्यमंत्री झालो –
यानंतर मी थेट उज्ज्वल निकम यांच्याकडे गेलो. कारण, त्यांचा संबंध थेट उद्धव साहेंबासोबत होता. उद्धव साहेबांना मी निकम साहेबांना माझ्या मंत्रीपदाबाबत फोन करायला लावला आणि त्यावेळेस त्यांनी माझ्याकरिता फोन लावला. दरम्यान, योगायोगाने एक-दीड महिन्यानंतर ज्यावेळी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यावेळी राज्यमंत्री मंडळामध्ये माझा समावेश झाला आणि मी सहकार राज्यमंत्री झालो, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
View this post on Instagram
देशविरोधी कारवाई करणाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणजे उज्ज्वल निकम –
मंत्री गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या जळगाव जिल्ह्याला ज्या चार-पाच जणांच्या नावाने ओळख आहे त्यामध्ये उज्ज्वल निकम यांचा समावेश आहे. देशासोबत गद्दारी करणारे, देशावर हल्ला करणारे आणि देशविरोधी घातकी कृत्य करणाऱ्या लोकांचा विरोधी कर्दनकाळ म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्याचे अँड. उज्ज्वल निकम साहेब, असे आपण अभिमानाने सांगतो.
हेही वाचा : Jalgaon Crime : जळगावात चाललंय तरी काय?, आणखी एका तरुणाचा खून, जुन्या वादातून घडलं भयंकर