सुनील माळी, प्रतिनिधी
पारोळा, 27 फेब्रुवारी : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पारोळा तालुक्यात देखील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे.
पारोळ्यात वादळी वाऱ्यासह गारपीट –
पारोळा तालुक्यातील वेल्हणे, कांकराज, भिलाली, शेवगे तसेच बहादरपुर, आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यावेळी गारपीट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, अवकाळी पावासमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
रब्बी हंगाम धोक्यात –
पारोळा तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि वादळी पावसाने यंदाच्याही रब्बी हंगामातील पिके उध्वस्त केली. आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने अभी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि इतर पिक आडवी झाली आहेत.
हेही वाचा : उद्योजक अमृत चौधरी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश