• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत किती महिलांनी अर्ज केले?

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
July 13, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत किती महिलांनी अर्ज केले?

जळगाव, 13 जुले : राज्यातील महायुतीच्या सरकारने महिलांसाठी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ही योजना सुरू केली आहे. महिलांना सक्षम करण्यासोबतच त्यांचे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेतील स्थान वाढावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यातच या योजनेच्या प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता आतापर्यंत या योजनेसाठी किती महिलांनी अर्ज केले, याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

आतापर्यंत किती महिलांनी अर्ज भरले –

जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत सर्व प्रशासकीय विभागाकडून 29,416 एवढे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच अधिकाधिक पात्र महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार –

या योजनेचे यशस्वी अर्ज भरणारे अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्यात येणार आहे.

परराज्यातील महिलांसाठी…

नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या आणि ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (1) जन्म दाखला किंवा (2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (3) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्डदेखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्या सोबतच ज्या महिलांचे पोस्टात बँक खाते असेल त्यांचे पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरणात येणार आहे.
राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने अधिकाधिक लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm ladki bahin yojanajalgaon newssuvarana khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेत महायुतीची घोषणा! मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा? मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टचं सांगितलं

जळगाव महापालिकेत महायुतीची घोषणा! मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा? मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टचं सांगितलं

December 28, 2025
‘अंमली पदार्थमुक्त गोवा’कडे निर्णायक पाऊल; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली 30 दिवसांची मोहीम सुरू

‘अंमली पदार्थमुक्त गोवा’कडे निर्णायक पाऊल; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली 30 दिवसांची मोहीम सुरू

December 27, 2025
Ram Sutar : महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

Ram Sutar : महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

December 26, 2025
Jalgaon News : जळगावात महाराष्ट्र होमगार्डचा 79 वा स्थापना दिन सप्ताह उत्साहात साजरा

Jalgaon News : जळगावात महाराष्ट्र होमगार्डचा 79 वा स्थापना दिन सप्ताह उत्साहात साजरा

December 26, 2025
नगरपरिषद-नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार, नेमकी बातमी काय?

नगरपरिषद-नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार, नेमकी बातमी काय?

December 26, 2025
Jalgaon News : जळगाव पोलिसांकडून ‘विशेष वाहन चेकिंग मोहिम’, तब्बल 13 लाख रूपयांचा दंड वसूल

Jalgaon News : जळगाव पोलिसांकडून ‘विशेष वाहन चेकिंग मोहिम’, तब्बल 13 लाख रूपयांचा दंड वसूल

December 26, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page