पुणे, 5 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला असून यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के लागलाय. तसेच विभागनिहाय निकालात कोकण विभागात सर्वाधिक 96.74 टक्के इतका तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा 89.46 टक्के निकाल लागलाय.
यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 94.58 टक्के इतका तर मुलांचा निकाल 89.51 टक्के इतका लागलाय. मुलांपेक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या जास्त असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल हा 5 टक्क्यांनी अधिक आहे. शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती आज दुपारी देण्यात आली.
यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला –
यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. तर फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 ने घसरला आहे.
विभागनिहाय निकाल –
- कोकण : 96.74 टक्के
- पुणे : 91.32 टक्के
- कोल्हापूर : 93.64 टक्के
- अमरावती : 91.43 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
- नाशिक : 91.31 टक्के
- लातूर : 89.46 टक्के
- नागपूर : 90.52 टक्के
- मुंबई : 92.93 टक्के
shivansh jagade upsc : 22 व्या वर्षी शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS, योगेश जागडेची प्रेरणादायी मुलाखत