पुणे, 4 मे : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 च्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली असून उद्या 5 मे रोजी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे.
बारावीचा निकाल उद्या 5 मे रोजी जाहीर होणार –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी खालीलप्रमाणे अधिकृत संकेतस्थळवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
1. https://results.digilocker.gov.in
2. https://mahahsscboard.in
3. http://hscresult.mkcl.org
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पाहता येणार निकाल? –
- maharesult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- ‘HSC Exmanation Result 2025’ या लिंकवर करा.
- आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
- यानंतर, यावर क्लिक करून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल हा स्क्रीनवर दिसेल.
- तसेच त्या निकालाची पीडीएफ सदर विद्यार्थी डाऊनलोड करू शकतात.
SMS द्वारे देखील निकाल पाहता येणार –
विद्यार्थ्यांना यासाठी MHSSC असे टाईप करावे लागेल आणि 5776 या क्रमांकावर पाठवून SMS द्वारे देखील त्यांना तो निकाल पाहता येईल.






