जळगाव, 11 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. यामध्ये कुठे जास्त तापमान तर कुठे कमी तर कधी ढगाळ वातावरण झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा फटका बसला होता. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काय आहे हवामानाचा अंदाज? –
सातत्याने राज्यातील हवामान बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, जळगावात आज पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच ढगाळ वातावरणाचा देखील अंदाज वर्तविण्यात आला.
राज्यात ‘या’ भागात पावसाचा अंदाज –
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘…त्यांचे राजकीय वय हे साडेतीन वर्ष’, माजी खासदार उन्मेश पाटील यांची आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीका