मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 13 एप्रिल : भारतीय जैन संघटना आणि सुहाना स्पाइसेस व महाराष्ट्र राज्य सरकार मृद व जलसंधारण विभाग यांच्या झालेल्या संयुक्त करारानुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, कृषि अधिकारी दीपक साळुंखे, किरण पाटील आदींच्या हस्ते या जलरथाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार यानी सांगितले की, ज्या गावांना माहिती नाही, अशा गावांमध्ये हा जलरथ जावुन तिथे शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम करा. तसेच कृषि अधिकारी दीपक सालुंखे यानी बोलताना सांगितले की,आमचे कार्यालयातर्फे आम्ही जनजागृती करत असतो, तरीही आपल्यामार्फत शेतकऱ्यांना जागृत केले तर भरपूर गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाला खोलिकरण व रुंदीकरण याबाबत चोपड़ा तालुक्यात जास्तीत जास्त कामे व्हावे, अशी आमची इच्छा आहे. दरम्यान, वेळोवेळी आमचे जे जे सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या दोन महत्त्वपूर्ण योजनांना कायमस्वरूपी मंजुरी देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करता येणार असून, शेतजमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत होणार आहे. या योजनेद्वारे यंत्रसामग्री व इंधनाचा खर्च प्रशासन करणार आहे. तसेच तलावातून काढलेला सुपीक गाळ शेतात टाकण्यासाठी शासनाकडून अल्प व अल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेचा गावागावात जाऊन प्रचार, प्रसार करणे, योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त गावांना प्रोत्साहित करणे, जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्यास सहकार्य करणे आणि सर्व लोकप्रतिनिधी व तालुका, जिल्हा प्रशासनाला भेटून चर्चा करून या योजनेची व्यापकता सर्व खेड्यापाड्यांत वाढवण्याचे काम भारतीय जैन संघटना करीत आहे यावेळी भारतीय जैन संघटनाचे जेष्ठ दीपक राखेचा, विभागीय उपाध्यक्ष लतिश जैन, विपुल छाजेड, अभय ब्रम्हेचा, शुभम राखेचा, आदि भारतीय जैन संघटनाचे कार्यकर्ते हजर होते. तसेच प्रचारक महेन्द्र पाटील व जिल्हा समन्वयक गणेश कोळी हजर होते.
हेही वाचा : Jalgaon News : जयभीम पदयात्रा उत्साहात पार; विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग