ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 एप्रिल : हनुमान जयंतीचे औचित्य साधत कृष्णापुरी परिसरातील जेष्ठ व सुज्ञ नागरिक यांनी एकत्र येऊन आज रोजी पाणपोईची सुरूवात केली. शांताराम बुधा पाटील यांच्या हस्ते आज त्या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. सध्या कडाक्याचं ऊन पडत असाताना कृष्णापुरी परिसरातील जेष्ठ नागरिकांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलाय.
कृष्णापुरी येथे जनसेवा पाणपोईचे उद्घाटन –
दरदिवशी पिण्याच्या पाण्याची सोय दोन महिने करण्याचा संकल्प देखील कृष्णापुरी येथील नागरिक यांनी केला. पोलीस पाटील पती अनिल सावंत, रवींद्र भावसार, महादू टेलर, गोपाल सूर्यवंशी, अनिल (छोटू) पाटील, दीपक विक्रम पाटील, गजानन पाटील मेडिकल, संजय महाजन रेश्मा टेंट, बालू आण्णा महाजन, पांडुरंग धनगर,मनोज माळी आरवे, मयूर महाजन, श्रीकांत बेंडाळे, शांताराम नारायण पाटील, अनिल सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, मनोज पाटील, बबलू पाटील, रामदास (तात्या) पाटील मोरया टेंट आदींनी यामध्ये सहकार्य केलंय.
कडाक्याच्या उन्हाळ्यास सुरूवात –
गेल्या आठवड्याभरापासून पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात कडाक्याचा उन्हाळा सुरू झालाय. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोय. अशातच दुपारच्या वेळी नागिकांना स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता कृष्णापुरी येथे जनसेवा पाणपोई उभारण्यात आली आहे. पुढील दोन महिने पिण्याच्या पाण्याची सोय या पाणपोईच्या माध्यमातून केली जाणार आहे.
हेही पाहा : ZP School Hol Pachora : 11 लाखांचं बक्षीस जिंकणारी जळगाव जिल्ह्यातील 1 नंबर शाळा | काय आहे खास?