• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

हरारेत U-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची दमदार कामगिरी, इंग्लंडवर मात करत भारत सहाव्यांदा विश्वविजेता

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 7, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
हरारेत U-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची दमदार कामगिरी, इंग्लंडवर मात करत भारत सहाव्यांदा विश्वविजेता

हरारे, 7 फेब्रुवारी : झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत इंग्लंडवर १०० धावांनी विजय मिळवला. मुंबईकर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या विजयासह सहाव्यांदा अंडर-१९ वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावून इतिहास रचला.

अंतिम सामन्यातील आकडेवारी –

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मागील सामन्यात शतक झळकावणारा आरोन जॉर्ज अवघ्या ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भक्कम भागीदारी रचली. आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ५३ धावांची संयमी खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीने तुफानी १७५ धावा ठोकल्या.

वैभवचे दुहेरी शतक केवळ २५ धावांनी हुकले. त्यानंतर वेदांत त्रिवेदीने ३२, विहान मल्होत्राने ३०, अभिज्ञान कुंडूने ४० आणि कनिष्क चौहानने नाबाद ३७ धावा करत भारताची धावसंख्या ९ बाद ४११ वर नेली.

सहाव्यांदा अंडर-१९ वर्ल्डकपवर आपले नाव कोरले –

भारतीय संघाने दिलेल्या ४१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का बसला. सलामीवीर जोसेफ मुरेस १७ धावांवर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स (६६) आणि बेन मेयस (४५) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठी खेळी उभी राहू शकली नाही. शेवटी कॅलेब मॅथ्यू फाल्कनरने झुंज दिली, पण विकेट्स पडत गेल्याने इंग्लंडला पराभव टाळता आला नाही.

भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ १०० धावांनी पराभूत झाला आणि भारताने सहाव्यांदा अंडर-१९ वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.

वैभव सूर्यवंशीची दमदार कामिगिरी –

भारत विरूद्ध इंग्लंडच्या या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने दमदार फलंदाजी केली. वैभवने केवळ ५५ चेंडूत शतक झळकावत स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान शतक नोंदवले. संपूर्ण स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने १५ चौकार आणि १५ षटकारांची आतषबाजी करत प्रेक्षकांना थक्क केले.

हेही वाचा : धक्कादायक! पद्मालय शिवारातील ‘त्या’ जळालेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; तृतीयपंथी महिलेची हत्या झाल्याचे उघड, आरोपी अटकेत

बातमी शेअर करा !
Share
Tags: harareindia vs englandsports newssuvarna khandesh liveu-19 world cup finalworld championsworld cup final

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page