• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

जागतिक हिवताप दिन : डंख छोटा, धोका मोठा- हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 25, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
जागतिक हिवताप दिन : डंख छोटा, धोका मोठा- हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी!

चोपडा, 24 एप्रिल : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे आहे.

सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत 25 एप्रिल 2024 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य “Accelerating the Fight Against Malaria for a more Eqitable World” मराठी भाषांतर ” मलेरिया विरुध्‍द जगाच्‍या संरक्षणासाठी, गतीमान करु हा लढा मलेरियाला हारविण्‍यासाठी !” असुन भविष्यात या आजाराचा उद्रेक होवु नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिने पुढील माहिती देण्यात येत आहे.

हिवताप –
हिवताप हा आजार “प्लाझमोडीअम” या परोपजीव जंतुमुळे होतो. या आजाराचा प्रसार अॅनाफिलस डासाच्या मादी मार्फत होतो. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना या रोगाची लागण होते. महाराष्ट्रात हिवतापाच्या जंतुचे फॅल्सीफेरम व व्हॉयव्हॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

डासांची उत्पत्ती –
स्वच्छ साठवुन राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इ. मध्ये होते.

हिवतापाचा प्रसार –
हिवताप प्रसारक अॅनाफिलस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होवुन डासाच्या चाव्यानंतर लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरिरात सोडले जातात. पुढे निरोगी मनुष्याच्या शरिरात ते जंतु यकृतमध्ये जातात व तेथे त्यांची वाढ होवुन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येते.

हिवतापाची लक्षणे –
थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येवु शकतो, ताप नंतर घाम येवुन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात.

रोग निदान –
प्रयोगशाळेत रक्तनमुना तपासणी :- हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्त नमुना तपासुन करता येतो. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळतात. तात्काळ निदान पध्दती :- आर. डी. के. ( Rapid Dignostic Kit) द्वारे स्पॉटवर रक्तनमुना घेऊन पी.एफ./पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते.

औषधोपचार –
औषधोपचार कोणताही ताप हा हिवताप असु शकतो. प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्त नमुना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीन व प्रायमाक्वीन गोळयाचा औषधोपचार घ्यावा. ही औषधी उपाशी पोटी घेवु नये. गरोदर स्त्रीयांनी प्रायमाक्वीन औषधी घेवु नये व ० ते १ वर्षाच्या बालकांना प्रायमाक्वीन औषधी देवु नये.

हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावेत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडया करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.
  • अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरूण घेवून झोपावे.
  • संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.
    आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान 2 ते 2.5 महिने सारवू (रंगरंगोटी) नये.
  • घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
वरिल दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासुन दुर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. सुरेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर आरोग्य खात्याकडुन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Special Interview : जळगावच्या डॉ. नेहा राजपूत UPSC मध्ये देशात 51 व्या, तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला

बातमी शेअर करा !
Share
Tags: world malaria dayworld malaria day 2024जागतिक हिवताप दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
VIDEO | राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मुद्दा उपस्थित

VIDEO | राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मुद्दा उपस्थित

March 5, 2026
हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

March 4, 2026
Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

March 4, 2026
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page