संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 13 जुलै : माझी वसुंधरा 5.0 या वृक्ष मोहिमेस पारोळा वासियांचा उस्फुर्त प्रतिसाद बघावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून “एक मिनिटात एक हजार वृक्ष” लागवड अभिनव उपक्रम राबविला गेला.
काय आहे संपुर्ण बातमी? –
पारोळा शहरातील विविध विद्यालय तसेच महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी शहरालगत असणाऱ्या वंजारी रस्ता टेकडीवर एकत्रित पद्धतीने एक मिनिटात एक हजार वृक्षाची लागवड गेली. यात शहरातील किसान महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, श्री बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ, बोहरा सेंट्रल स्कूल, अँग्लो इंडियन उर्दू शाळा, जिल्हा परिषद शाळा या शाळांनी आपला सहभाग नोंदविला.
हजारो विद्यार्थी, वृक्षप्रेमी एकत्र पर्यावरणासाठी आल्याने परिसर पर्यावरण प्रेमींनी खुलून गेला होता. या वृक्षांच्या संगोपनासाठी विशेष काळजी घेतली जाईल हे वृक्ष जगविणे, आपल्या सर्वांची जबाबदारी असल्यामुळे हरीत शपथ यावेळी देण्यात आली. यावेळी शाळा शिक्षक, प्राध्यापक पर्यावरण दूत, नपा अधिकारी- कर्मचारी, व नागरिक आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा : Pooja Khedekar: पूजा खेडकर प्रकरणात विद्यार्थ्यांवर अन्याय, कारवाई करावीच लागेल – विजय कुंभार