• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 21, 2025
in भुसावळ, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

भुसावळ, 21 जून : आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दिनांक 21 जून रोजी “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित भव्य योग सत्राचे आयोजन भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर करण्यात आले. या कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय –

या सामूहिक योग सत्रात केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री रक्षा निखिल खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे, मंडल रेल्वे प्रबंधक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागांचे अधिकारी, शाळांचे विद्यार्थी, नागरिक, रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

योग शिक्षिका चंचल माळी, डॉ. आदित्य व डॉ. शरयू यांनी विविध योगासने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे विशद केले. त्यांनी सांगितले की, योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त असून मानसिक संतुलन व आत्मिक शांती साधणारा मार्ग आहे.

या योग सत्रात प्राणायाम, विविध योगासनं आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता. उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून कार्यक्रमात एकरूपता साधली.

‘नियमित योगाभ्यास करा, निरोगी आयुष्य जगा’ हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

योग शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण करतो. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आत्मिक समाधान आणि सकारात्मकता वाढते. त्यामुळे योग जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी केले. यावेळी राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही योगाचे महत्व विशद केले.

भुसावळ विभागातील विविध रेल्वे डेपो, कार्यशाळा आणि कार्यालयांमध्येही योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने व रेल्वे विभागाने सोशल मीडियाच्या माध्यमातून योगाचे फायदे आणि योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश प्रसारित करून व्यापक जनजागृती घडवून आणली.

भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आंध्रप्रदेशातूतील विशाखापट्टनम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजित करण्यात आला होता. दूरदृष्य प्रणालीद्वारे भव्य पडद्यावर या ठिकाणी दाखविण्यात आला.

हेही वाचा : चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawal newsbhusawal railway groundinternational yoga daysuvarna khandesh liveyoga day celebration

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page