जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना नुकतंच 4 फेब्रुवारीला जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्विकारुन 1 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने आयपीएस अधिकारी डॉ. महेश्वर रेड्डी यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी 1 वर्षातील जळगाव जिल्हा पोलीस दलाची कामगिरी, जळगाव जिल्ह्यातील वाढते अपघात, पोलीस यंत्रणा आणि नागरिकांना आवाहन, तसेच जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या गावठी कट्टे आढळण्याचे प्रमाण अन् पोलिसांची विशेष मोहीम, सायबर क्राइमच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या फसवणुकीच्या घटनांवर खबरदारीचे उपाय आणि सोशल मीडिया, क्राइम आणि तरुणाई या सर्व विषयांवर महत्त्वाचे भाष्य केले.