मुंबई, 5 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालकपदी महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक –
गेल्या काही दिवसांपासून महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी नाव चर्चेत होते. एमपीएससीच्या अध्यक्षपदी सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची नियुक्तीला करण्यात आल्याने रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत.
कोण आहेत रश्मी शुक्ला –
राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्त झालेल्या रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने त्यांची चौकशी सुरु केली होती. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणातील मुंबई व पुण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.
रजनीश शेठ एमपीएससीच्या अध्यक्षपदी –
रजनीश सेठ यांनी व्हीआरएस घेऊन नवी जबाबदारी स्वीकारली आहे. रजनीश सेठ हे येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्याआधीच त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, रजनीश शेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने जेष्ठ महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.