पाचोरा, 28 जून : जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल हे आज पाचोरा दौऱ्यावर येत आहे. सकाळी 11 वाजता ते तहसिल कार्यालय पाचोरा येथे तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतील. यानंतर दुपारी 12.30 वाजता नागरिकांच्या भेटी, निवेदने स्विकारतील आणि त्यावर चर्चा करतील.
यानंतर दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा दौरा संपन्न झाल्यानंतर 3 कार्यालयीन दिवसांच्या आंत नागरिकांच्या प्राप्त तक्रारी, अर्ज निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी. त्यावर जिल्हाधिकारी कार्यलयाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.