जळगाव, 3 मार्च : जळगाव जिल्ह्याने बालहक्क संरक्षण आणि कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘बालस्नेही पुरस्कार-2024’ ने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने या कार्याची दखल घेतली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्या हस्ते आणि आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हा पुरस्कार स्विकारण्यासाठी आर. आर. तडवी – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंत भदाणे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास, वर्षा वाघमारे – जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या तिघांना प्राधिकृत केले होते. या यशामध्ये जळगाव जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा आहे.
दरम्यान, त्यांच्या अथक मेहनतीला मान्यता मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे अभिनंदन केले असून हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार, 3 आरोपी अजूनही फरारच