जळगाव, 30 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांची संकल्पनेतून प्रथमच दहावीत उत्तीर्ण झालेल्या पोलीस पाल्यांचा गौरव करण्यात आला.
पोलीस पाल्यांचा गौरव –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रथमच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या ज्या पाल्यांना 80% च्या वर गुण मिळवुन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होवून यश संपादन केले आहे. अशा पाल्यांचा काल जिल्हा पोलीस दिनांक पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रमोद पवार, पोलीस उपअधीक्षक गृह यांच्या हस्ते एकुण 42 पाल्यांना प्रशंसापत्र व बक्षिस देवून गौरवण्यात आले. त्यात विशेषतः हा कु. सुष्टी ज्ञानेश्वर बागूल हिने 98.40 % ने उत्तीर्ण होवून जळगाव शहरात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सदर कार्यक्रमावेळी पोनि दिपक बुधवंत, मानव संसाधन विभाग व रापोनि संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आयोजन पोउनि रेश्मा अवतारे, मानव संसाधन विभाग यांनी केले.
हेही वाचा : मोठी बातमी! पुढील 24 तासात मान्सून केरळमध्ये होणार दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?