• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 17, 2026
in भडगाव, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

जळगाव, 17 जुलै: भडगाव येथील भारत फायनान्स कंपनीची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून सुमारे 51 हजार 560 रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

याप्रकरणी फिर्यादी यश हिरामण हटकर (रा. शिवनेरी गेट, भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 227/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यात कलम 310(1) चीही वाढ करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला असता या कटाचा सूत्रधार उदय छोटे गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. तो भारत फायनान्स कंपनीत काम करत असल्याने कंपनीत दररोज जमा होणारी रोख रक्कम कोण आणि किती वाजता घेऊन जातो, याची त्याला अचूक माहिती होती. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांसह चोरीचा कट रचल्याची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता आरोपी वेगवेगळ्या मोटारसायकलवर भडगाव येथे आले. त्यानंतर भारत फायनान्स कंपनीची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवून त्याची बॅग हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उदय छोटे गायकवाड (रा. अनकवाडी, धुळे), अनिल दिलीप पाटील (रा. पळासखेडा, ता. भडगाव), विशाल मधुकर गांगुर्डे (रा. पूर्वीपाडा, धुळे), निलेश अण्णा पवार (रा. अनकवाडी, धुळे) आणि योगेश प्रकाश पवार (रा. अनकवाडी, धुळे) यांचा समावेश आहे. तर सागर हिम्मत पाटील व हर्षल चांगदेव अहिरे हे दोघे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सदर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी करंकार करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

हेही वाचा: VIDEO | जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon bag-snatching casejalgaon lcbjalgaon policemarathi newssp shrikant dhivresuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page