• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

देशभक्तीच्या रंगात न्हालं जळगाव जिल्हा कारागृह; “जीवन गाणे गातच जावे” संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 26, 2025
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
jivan gane gatach jave musical awareness program concluded at Jalgaon District Jail

देशभक्तीच्या रंगात न्हालं जळगाव जिल्हा कारागृह; "जीवन गाणे गातच जावे" संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव : कारागृहातील बंदी यांचा भावनिक विकास होऊन सकारात्मक विचारसरणी रुजावी, यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. समाजविघातक प्रवृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंदींचे समुपदेशन देशभक्तिपर गाण्यांच्या माध्यमातून व्हावे, तसेच संगीताच्या प्रभावी माध्यमातून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर नेऊन त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवावी, या उद्देशाने “जीवन गाणे गातच जावे” या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन काल जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले.

जिल्हा कारागृहाच्या कला भवनात झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील होते. जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. जे. चव्हाण, तुरुंग अधिकारी राकेश देवरे, सुभेदार सुभाष खरे, श्री. खांडरे आदी उपस्थित होते.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील सर्व कारागृहांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभक्तीपर गीतांनी भरले रंग

कार्यक्रमाची सुरुवात स्वर शुभम ग्रुपच्या प्रतीथयश कलाकार कपिल घुगे आणि सहकारी यांच्या सादरीकरणाने झाली. “इतनी शक्ति हमें देना दाता” या प्रार्थनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर विविध देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. बंदी बांधवांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली. “भारत मातेच्या जयघोषाने” संपूर्ण कारागृह दुमदुमून गेले. विशेष म्हणजे, कारागृहात बंदीवास भोगत असलेल्या दोन बंदिवान बांधवांनीही भक्तिगीत व देशभक्तिपर गीते सादर केली.

शाहीर विनोद ढगे यांच्या भारुडाने प्रबोधन

जळगावचे सुप्रसिद्ध लोकशाहीर शाहीर विनोद ढगे आणि त्यांची “दिशा काला पथक” संस्था यांच्यातर्फे पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून भारुड सादर करण्यात आले. व्यसनमुक्ती व सकारात्मक जीवनदृष्टी यावर भर देणाऱ्या भारुडाने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.

कलावंतांचा प्रभावी सहभाग

स्वर शुभम ग्रुप व दिशा काला पथकाच्या १५ कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाची सांगता स्वर शुभम ग्रुपच्या कलावंत वर्षा पाटील यांच्या “है मालिक, तेरे बंदे हम” या गाण्याने झाली. कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, विनोद पाटील, आकाश भावसार, मनोज जैन यांनी मेहनत घेतली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaonjalgaon district jailjalgaon jailjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर; बांबरूड–कुंरगी गटात उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग

Pachora News : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर; बांबरूड–कुंरगी गटात उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग

October 13, 2025
Update News:  जिल्हा परिषद निवडणुकीसाठी  आरक्षण जाहीर;  जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण  जाणून घ्या एका क्लिकवर

Update News: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

October 13, 2025
विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

October 13, 2025
तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

October 13, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page