लासगाव (पाचोरा), 2 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे परंपेनुसार अखंड किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तन सप्ताहाचे हे 71 वे वर्ष असून आज, 2 फेब्रुवारीपासून या किर्तन सप्ताहाची सुरूवात होत आहे.
किर्तन सप्ताहाचे असे आहे नियोजन –
लासगावात आज, 2 फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा किर्तन सप्ताह 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सकाळी 5 ते 6 काकडा भजन तसेच संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री साडे आठ ते साडे दहा वाजेच्या दरम्यान किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
यासोबतच, सप्ताहाच्या निमित्त गावात दिंडी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, लासगावातील विठ्ठल रूखमाई मंदिर परिसरात किर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून या किर्तन सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कोणत्या किर्तनकारांचे होणार किर्तन? –
- गुरूवार, 2 फेब्रवारी 2026 – ह.भ.प. पंडित महाराज बांबरूड राणीचे मोहाडीकर
- शुक्रवार, 3 फेब्रवारी 2026 – ह.भ.प. शुभम महाराज मंदानेकर
- शनिवार, 4 फेब्रवारी 2026 – ह.भ.प. दिनेश महाराज कांचनपुरकर
- रविवार, 5 फेब्रवारी 2026 – ह.भ.प. राजेंद्र महाराज केकतनिंभोरा
- सोमवार, 6 फेब्रवारी 2026 – ह.भ.प. बाबा रविदास महाराज वरसाडेकर
- मंगळवार, 7 फेब्रवारी 2026 – ह.भ.प. जितेश महाराज म्हसावदकर
- बुधवार, 8 फेब्रुवारी 2026 – ह.भ.प. मच्छिंद्र महाराज वाडीभोकर
- गुरूवार, 9 फेब्रुवारी 2026 या दिवशी ह.भ.प. सुर्यभान महाराज शेडगावकर यांचे यांचे काल्याचे किर्तन सकाळी 9 ते 11 दरम्यान होईल.
या किर्तन सप्ताहात गायनाचार्य ह.भ.प. प्रदीप महाराज कडेवडगाव, ह.भ.प. नितीन महाराज शिरसोलीकर तसेच मृदंगाचार्य ह.भ.प. पांडुरंग महाराज कुऱ्हाड आणि ह.भ.प. भगवान महाराज लासगाव हे सेवा देणार आहेत.
हेही वाचा : विशेष लेख | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनिमित्ताने……






