ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 14 मार्च: पाचोरा तालुक्यातील सातगांव डोंगरी येथील जि.प. शाळेसाठी ग्रामपंचायत सातगांव डोंगरी येथील ग्रामविकास अधिकारी विकास पाटील यांनी ग्रामपंचायत मार्फत LED ANDROID TV ( 5 नग ) देण्यात आले आहेत. यामुळे सर्व शाळा डिजिटल क्लासरुमची झाली आहे. तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अध्ययन अध्यापनासाठी मोठ्या प्रमाणात सदर टि.व्हीं चा वापर होणार असल्यामुळे पालक वर्गाकडून शाळेच्या होत असलेल्या विकासाबाबत समाधान व्यक्त केले.
शाळेला गावाचा आधार असावा व गावाला शाळेचा अभिमान असावा ही संकल्पना ग्रामीण शिक्षणाचा पाया बळकट करत असते. सातगांव डोंगरी येथील ग्रामस्थ आणि पालक यांनी शाळेच्या भौतिक सुविधा (उदा. डिजिटल वर्गखोल्या, क्रीडांगण) आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन शाळेचा विकासाचा चंग बांधतांना दिसून येत आहेत.
दरम्यान, शाळा विकास कामात महत्त्वाची भूमिका घेणारे ग्रामविकास अधिकारी विकास पाटील तसेच सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी शाळेला केलेल्या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवाणसिंग उमराव पाटील व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र बाबूलाल पाटील व सर्व शिक्षक वृंद यांच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे.






