• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora Breaking! ‘पक्षाला अंधारात ठेऊन स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय’; मधुकर काटेंचा भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 10, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora Breaking! ‘पक्षाला अंधारात ठेऊन स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय’; मधुकर काटेंचा भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आरोप

पाचोरा, 10 जानेवारी : पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने बहुमत मिळवलं असून नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला आहे. तर दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकांची देखील निवड करण्यात येत असताना भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतलाय. पक्षाला अंधारात ठेऊन स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय झाला असल्याचा आरोप माजी जि.प. सदस्य तथा जळगाव भाजप ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटेंनी केला आहे. पक्षावर कोणतीही नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मधुकर काटे काय म्हणाले? –

पाचोरा शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात मधूकर काटे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आज दुपारी पत्रकार परिषद घेत पक्षातील नेत्यांकडून करण्यात आलेल्या स्वीकृत सदस्य निवडीवर आक्षेप व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना मधूकर काटे म्हणाले की, आमच्यासारख्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना चिंतन बैठकीला बोलवले. मात्र, गटनेता निवडीबाबत परस्पर निर्णय घेण्यात आला. अखेर, पक्षाचा निर्णय असल्याने तो आम्ही मान्य केला.

स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निर्णयाविरोधात पत्रकार परिषद –

पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत अनेकांना संधी देण्यात आली. यामध्ये काही जण जिंकले तर काही पराभूत झाले. म्हणून पराभूत झालेल्या उमेदवारांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करू नये. याव्यतिरिक्त, संधी न मिळालेल्या आणि भाजपसाठी सातत्याने झटणाऱ्या कार्यकर्त्यांची नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली पाहिजे, असा आग्रह आमच्यासारख्या ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांचा होता.

आरोप नेमका कोणावर? –

याबाबत पक्षाच्यावतीने आम्हाला आश्वासन दिले असताना देखील परस्पर निर्णय घेऊन कृष्णापुरीतील अविनाश सुतार यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन नगरपरिषदेत दाखल करण्यात आली. मी स्वतः नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत बोललो असून त्यांनी देखील सदर घटनेला दुजोरा दिलाय. खरंतर, आमचा त्या कार्यकर्त्याला आक्षेप नाही. परंतु, आम्ही पक्षासाठी 30 ते 35 वर्ष स्वतःला वाहून घेतलंय. असे असताना आम्हाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेता स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय घेतला असल्याचे मधुकर काटे म्हणाले. दिलीप वाघ, संजय वाघ तसेच अमोल शिंदे यांच्यावतीने हा निर्णय घेण्यात आलाचा आरोपही मधूकर काटे यांनी केला.

दरम्यान, पाचोरा नगरपरिषदेसाठी परस्परपद्धतीने भाजपकडून स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय अत्यंत चुकीचा असून कार्यकर्त्यांचा जिव्हारी लागलाय. व्यक्तीगत मधू काटे म्हणून हा विषय नसून पक्षातील सगळेच पदाधिकाऱ्यांनी नाराजीची भावना व्यक्त केली आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निर्णयाबाबत पक्षाचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, महानगरपालिका निवडणुकीत ते व्यस्त असल्याने त्यांच्यासोबत बोलणे झालेले नाहीये. पण आमदार मंगेश चव्हाण आणि जिल्हाध्यक्षांसोबत याबाबत चर्चा झाली.

कोणीही राजीनामा देणार नाही –

स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निर्णयाविरोधात पक्षातील कुठल्याही पदाधिकाऱ्याची अथवा कार्यकर्त्यांची नाराजी नसून कोणीही राजीनामा देणार नाही. परंतु, अशापद्धतीने निर्णय लादण्यात आल्याने त्या निर्णयाला आम्ही विरोध केला असल्याचे मधूकर काटे यांनी सांगितले. दरम्यान, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना खालील स्तरावर सूचना करूनही वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोपही मधुकर काटे यांनी केला.

प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी –

मधुकर काटे पुढे म्हणाले की, स्वीकृत नगरसेवक पदाची निवड रद्द करून वरिष्ठांनी याबाबत निर्णय घ्यावा आणि जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्या पाच कार्यकर्त्यांना पाच वर्षांसाठी संधी द्यावी. मंत्री गिरीश महाजन पक्षाच्यावतीने जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणूक जिल्ह्याची निवडणूक असल्याने वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे भारतीय जनता पक्षाची वाटचाल असेल. तसेच ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी अतिशय उत्साहापुर्ण वातावरणात या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही मधूकर काटे म्हणाले.


हेही वाचा : मनपा निवडणुकीच्या मतदानाआधीच जळगाव भाजपचा बंडखोरांना मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह 27 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp leadersmadhukar katemarathi newsnominated nagarsevakpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

अजित पवारांचं दुर्दैवी निधन; जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

February 1, 2026
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page