मुंबई, 28 जुलै : देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील जेष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची पहिल्यांदाच राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वयाच्या बाराव्या वर्षी RSS मध्ये दाखल झाल्यापासून ते थेट राजस्थानच्या राज्यपाल पदापर्यंतचा प्रवासाविषयी जाणून घेऊयात सविस्तर…
हरिभाऊ बागडे राजस्थानचे नवे राज्यपाल –
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक केलीय. दरम्यान, डोक्यावर गांधी टोपी आणि अगदी साधी राहणीमान असलेले हरिभाऊ बागडे छत्रपती संभाजीनगरचे नेते असून ते आता राजस्थानमध्ये राज्यपाल पदाची धुरा सांभाळणार आहेत. आमदार, मंत्री आणि आता थेट राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे असा त्यांचा प्रवास राहिलाय. मातीतून कष्टाने वर आलेले नेते, अशी हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे.
हरिभाऊ बागडेंचा प्रवास –
हरिभाऊ बागळे यांनी लहानपणी अगदी पेपर टाकण्याचे काम केले. यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून ते आरएसएससोबत जोडले गेले. मागील 65 वर्षांपासून त्यांनी आरएसएसमध्ये काम केलंय. तसेच हरिभाऊ बागडे यांनी 1985 ला आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून येत त्यांनी आमदार म्हणन काम केले. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड विधानसभा अध्यक्ष म्हणून देखील निवड झाली. अन्न व नागरी पुरवठा या खात्याचे मंत्री देखील राहिले आहेत. दरम्यान, आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती, ‘असा’ आहे त्यांचा परिचय