• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 21, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, 21 फेब्रुवारी: राज्यातील मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ज्यांची मुदत संपणार आहे, त्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी जानेवारीत जारी केलेल्या परिपत्रकात 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर स्वतंत्र प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर झाला होता. मात्र राज्यातील ग्रामपंचायतींची मोठी संख्या आणि पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाऱ्यांची अपुरी उपलब्धता लक्षात घेता अंमलबजावणीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती पाहता सरकारने निर्णयात बदल केला आहे.

सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार –

सुधारित निर्णयानुसार, ग्रामपंचायतीची मुदत संपेपर्यंत पदावर असलेले सरपंचच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळतील. त्यांच्या सहकार्याकरिता उपसरपंच आणि विद्यमान सदस्यांची एक प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णयप्रक्रिया खंडित न होता सुरळीतपणे सुरू राहील, तसेच नव्याने येणाऱ्या प्रशासकांना कारभार समजून घेण्यासाठी लागणारा कालावधीही टळेल.

कालावधीची मर्यादा –

नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रशासक आणि समितीचा कार्यकाळ हा सहा महिन्यांपर्यंत किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत — जे आधी होईल तेवढाच असेल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने निवडून आलेले प्रतिनिधी नियमितपणे कारभार हाती घेतील. दरम्यान, हा निर्णय सध्या 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींनाच लागू असेल. प्रशासक व समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत.

राज्य सरकारकडून नव्या निर्णयाची घोषणा –

राज्यात सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा लवकरच संपणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक अपेक्षित असलेल्या ग्रामपंचायतींवर ग्रामसेवकांना प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केला होता. मात्र,  या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला होता. उच्च न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारला लेखी उत्तर सादर करण्यासाठी 24 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. परंतुर, त्याआधीच राज्य सरकारने नव्या निर्णयाची घोषणा केली आहे.

हेही वाचा:  संजय राऊतांविरोधात मंत्री दादा भुसेंकडून खटला मागे; मानहानी प्रकरण नेमकं काय होतं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: administratorGram Panchayatrural development departmentsarpanch

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! सरपंच पाहणार प्रशासक म्हणून कारभार; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
संजय राऊतांविरोधात मंत्री दादा भुसेंकडून खटला मागे; मानहानी प्रकरण नेमकं काय होतं?

संजय राऊतांविरोधात मंत्री दादा भुसेंकडून खटला मागे; मानहानी प्रकरण नेमकं काय होतं?

February 21, 2026
Tribal Development Project to have a sub-office at Erandol!, Tribal Development Minister Dr. Ashok Uike announced at the state-level meeting as per the demand of the Guardian Minister

आदिवासी विकास प्रकल्पाचे एरंडोल येथे उपकार्यालय होणार!, पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार राज्यस्तरीय बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची घोषणा

February 20, 2026
‘मोफत वाटप किती दिवस?’ त्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा; सर्वोच्च न्यायालयाची सरकारला सुनावणी

‘मोफत वाटप किती दिवस?’ त्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा; सर्वोच्च न्यायालयाची सरकारला सुनावणी

February 20, 2026
महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचे श्रमिक बजेट मंजूर: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचे श्रमिक बजेट मंजूर: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

February 20, 2026
शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

February 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page