नागपूर, 14 डिसेंबर : विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. यानंतर आता पुढील अधिवेशन सोमवारी, 23 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.
नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ मध्ये विधानसभेत झालेले कामकाज पुढीलप्रमाणे –
एकूण बैठकींची संख्या : 7
प्रत्यक्ष झालेले कामकाज : 72 तास 35 मिनिटे.
अन्य कारणांमुळे वेळा गेलेला वेळ : 10 मिनिटे
रोजचे सरासरी कामकाज : 10 तास 22 मिनिटे
शोक प्रस्ताव : 12
तारांकित प्रश्न –
प्राप्त प्रश्न : 7286; स्वीकृत प्रश्न : 215
उत्तरीत झालेले प्रश्न : 27
तारांकित प्रश्नाच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचना : 23,
स्वीकृत : 19, चर्चा झाली : 2
सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना : 160,
मान्य सूचना 69,
सहा अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले
नापसंत अध्यादेशांची संख्या सहा.
शासकीय विधेयके –
विधानसभा,
पुनर्स्थापित : 18
संमत : 16
विधानपरिषद संमत : 4
अशासकीय विधेयके –
प्राप्त सूचना : 21,
मान्य : 8
पुनर्स्थापित : 8
लक्षवेधी सूचना –
एकूण प्राप्त सूचना : 1867
स्वीकृत सूचना : 299
चर्चा झालेली सूचना : 70
नियम 97 अन्वयेच्या सूचना
प्राप्त सूचना : 27
मान्य निरंक
चर्चा झाली निरंक.
नियम 293 अन्वये प्रस्ताव,
प्राप्त सूचना : 2
मान्य : 2
चर्चा झाली : 2
अशासकीय ठराव
प्राप्त सूचना : 220
मान्य : 262
सदस्यांची उपस्थिती
सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती: 90.98%
किमान उपस्थिती : 43.85%
एकूण सरासरी उपस्थिती : 75.94%.
दरम्यान, बंकिमचंद्र चॅटर्जी लिखीत वंदे मातरम या गीतास दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली. या ऐतिहासिक पर्वा निमित्त सभागृहामध्ये वंदे मातरम या संपूर्ण गीताचे समूह गायन करण्यात आले.






