पारोळा, 15 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या 19 फेब्रुवारीला आहे आणि याच दिवशी महाराष्ट्र शेतकरी संघटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने संघटनेचा प्रथम वर्धापन दिवस, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असे दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
याच अनुषंगाने महाराष्ट्र शेतकरी संघटनेची बैठक काल पारोळा येथे संपन्न झाली. संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या कार्यालयात ही बैठक सपन्न झाली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संघटनेचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
हेही वाचा – अल्पभूधारक शेतकऱ्याची कमाल, नव्या कृषीपद्धतींचा वापर अन् मिरची पिकातून मिळवला हजारोंचा नफा
बैठकीला हे मान्यवर होते उपस्थित –
या बैठकीला संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा कल्याणी देवरे, भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर, उपाध्यक्ष शांताराम आचारी, महासचिव जगन्नाथ मोरे, सदस्य अशोक पाटील, पारोळा तालुका अध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, तामसवाडी शाखाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, नगाव शाखाध्यक्ष मोठाभाऊ पाटील, सांगवी उपाध्यक्ष भिकन पाटील, सचिव दिलीप पाटील, मेहू शाखेचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, विनोद पाटील, योगिता पाटील सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.