जळगाव, 17 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या उद्या आणि परवा म्हणजेच 18 व 19 सप्टेंबर रोजी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या विविध ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 19 सप्टेंबर रोजी 11 वाजल्यापासून जनसुनावणी पार पडणार आहे.
जनसुनावणीचे आयोजन –
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता जनसुनावणी राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहनही आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
रुपाली चाकणकर यांचा असा आहे दौरा –
- रुपाली चाकणकर यांचे दिनांक 18 सप्टेंबर, रोजी सकाळी महाराष्ट्र एक्सप्रसने जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन
- सकाळी 8.30 ते 9.00 वाजता फैजाने पटेल ( विद्यार्थी महानगराध्यक्ष) यांच्या घरी सदिच्छा भेट, स्थळ – राजमालती नगर, दूध फेडरेशन जवळ, जळगाव
- सकाळी 9 ते 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आढावा बैठक
- सकाळी 10.10 वाजता जे. डी. सी. सी बँक कॉलनी शाहूनगर येथे स्वागत
- सकाळी 10.30 ते 11 वाजता लाडकी बहिण योजना स्वाक्षरी मोहीम व मानवी साखळी कार्यक्रम शुभारंभ
- सकाळी 11 ते 12.30 वाजता महिला संवाद मेळावा, काटया फाईल जळगाव
- दुपारी 12.15 वाजता एरंडोल येथे आगमन
- दुपारी 1 ते 2.30 वाजता राखीव
- दुपारी 2.30 ते 4 वाजता विद्यार्थी संवाद, स्थळ – डी.डी. सी.पी कॉलेज एरंडोल
- सायंकाळी 4.30 वाजता एरंडोल येथून पारोळाकडे प्रयाण
- सायंकाळी 5 वाजता पारोळा येथे आगमन, सायंकाळी 5.30 वाजता महिला संवाद कार्यक्रम, स्थळ :- विजया लॉन्स भडगांव रोड, पारोळा,
- सोईनुसार जळगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम,
- गुरुवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव कडे प्रयाण
- सकाळी 11 ते 2 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जनसुनावणी,
- दुपारी 2 वाजता मुक्ताईनगरकडे प्रयाण
- दुपारी 3 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन
- दुपारी 3 ते 4 वाजता संत मुक्ताबाई कॉलेजच्या विद्यार्थींशी संवाद
- सायंकाळी 4.30 वाजता रेल्वे स्टेशन जळगाव कडे प्रयाण
- सायंकाळी 6.20 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाववरुन पुणेकडे प्रयाण