• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 18, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

मुंबई, 18 फेब्रुवारी : राज्यातील मुस्लिम समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) अंतर्गत देण्यात आलेले 5 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. 2014 मधील अध्यादेशाचे पुढे कायद्यात रूपांतर न झाल्याने तो आपोआप निष्प्रभ ठरल्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे.

नेमकी बातमी काय? –

9 जुलै 2014 रोजी काढण्यात आलेला अध्यादेश डिसेंबर 2014 पर्यंत विधिमंडळात कायद्यात परिवर्तित झाला नव्हता. परिणामी, तो रद्दबातल मानला गेला. मात्र, अध्यादेश कालबाह्य ठरूनही मुस्लिम समाजातील लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरूच राहिल्याची बाब समोर आली होती. आता सुमारे बारा वर्षांनंतर राज्य सरकारने या संदर्भातील आरक्षण अधिकृतरीत्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण रद्द –

2014 मधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण जाहीर केले होते. मंत्रिमंडळ बैठकीत अल्पसंख्याक मंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता आणि तो मंजूर करण्यात आला होता.

या निर्णयानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटाला विशेष मागास प्रवर्ग-अ अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरती तसेच शैक्षणिक प्रवेशांमध्ये 5 टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते. मात्र, नंतर उच्च न्यायालयाने सरळसेवा भरतीतील 5 टक्के आरक्षणास स्थगिती दिली होती.

त्यानंतर आता न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन, राज्य सरकारने या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी रद्द केला.  दरम्यान, या निर्णयामुळे मुस्लिम समाजात मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: mahayuti governmentmarathi newssebc reservationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

April 8, 2026
नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

April 8, 2026
जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

April 8, 2026
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

April 8, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

April 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page