जळगाव, 19 एप्रिल : महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा गौप्यस्फोटाचा एका पत्रकाराचा हवाला देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंसह अनिल थत्ते नामक पत्रकाराला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात पत्रकारांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिलीय.
गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिलीय. त्यामुळे त्यांनी आता उत्तर द्यावं. आता कोर्ट ठरवेल. त्यांची कमरेखालची भाषा थांबतच नाहीये. यामुळे मी आता कोर्टात गेलोय. कमरेखालची भाषा मला बोलत नाही. मी बोललो तर पंचाईतही होईल. पण मी बोलणार नाही. दरम्यान, मी आता न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केलाय त्याचं उत्तर त्यांनी द्वावं, असे मंत्री महाजन म्हणाले.
नेमकं प्रकरण काय? –
एकनाथ खडसे यांनी गगनभेदीचे अनिल थत्ते यांनी गिरीश महाजन यांच्यासंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटाचा हवाला देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले होते की, ‘गिरीश महाराजांनाच्या रंगल्या रात्री’ अशा विषयाखाली एका पत्रकाराने एक क्लिप प्रकाशित केली असून त्यात गिरीश महाजानांचे महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत, असे त्या पत्रकाराने सांगितले आहे. दरम्यान, या आरोपांसंदर्भात मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही खडसे म्हणाले होते.
View this post on Instagram
महाजनांच्या नोटीसमुळे खडसेंच्या अडचणी वाढणार? –
एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसे आणि अनिल थत्ते यांनी केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी कायदेशीर पावलं उचलण्याचे निश्चित केले. एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. एकनाथ खडसे तसेच अनिल थत्ते यांनी आपली प्रतिमा मलिन केल्याचे सांगत गिरीश महाजनांच्या वकिलामार्फत अब्रुनुकसानीची देण्यात आली आहे. यामुळे महाजनांच्या नोटीसमुळे खडसेंसह अनिल थत्तेंच्या अडचणी वाढणार का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.