चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 11 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी आमच्या 225 जागा येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून लोकसभेचे ठोकळे हे विधानसभेत चालत नाही, असे ते म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत होते.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील? –
नवी दिल्लीत मंत्री गुलाबराव पाटील माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, लोकसभेचा विचार केला तर आम्ही 133 जागा त्यांच्यापुढे आहोत. आणि त्यांच्या जर 225 असतील तर आमच्या किती असतील याचा अंदाज आपण लावावा. तसेच लोकसभेचे ठोकळे हे विधानसभेत चालत नाही. यामुळे पवार साहेब हे जेष्ठ नेते आहेत. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका आणि आमदारकी आणि खासदारकी निवडणूक यामध्ये फरक आहे. याचे चित्र लवकरच स्पष्ठ होणार आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत आमचे सर्व आमदार जिंकून येणार, असल्याचा विश्वास मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
दिल्लीत आढावा बैठकीला उपस्थिती –
नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या दालनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज पाणी पुरवठा तसेच स्वच्छते संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील सध्यास्थितीतील माहिती दिली. येणाऱ्या 2025 पर्यंत जल जीवन मिशनमध्ये महाराष्ट्र स्वयंपुर्ण असेल, असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासित केले.
पालकमंत्री म्हणून जळगाव जिल्ह्यासाठी केल्या मागण्या –
दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सी. आर. पाटील यांच्याकडे महत्वपुर्ण मागण्या केल्या. अर्ध्या जळगावला ओलीताखाली आणू शकणाऱ्य निम्न तापी प्रकल्प आहे. आणि म्हणून त्याचा बळीराजामध्ये समावेश करावा, अशी त्यांच्याकडे मागणी केलीय. दरम्यान, याचा समावेश करण्याचे आश्वासन सी.आर. पाटील यांनी दिले असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
तेजस ठाकरे यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया –
अनंत अंबीनी यांच्या मुलाच्या लग्नात नाचतानाचा तेजस ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर बोलतना मंत्री पाटील म्हणाले की, सभागृहातील यांची भाषणे पाहिले तर अंबानी यांचे वडिलोपार्जित दुश्मन असल्यासारखे यांची भाषणे असतात आणि त्याच अंबानींच्या लग्नामध्ये बारीक डान्स हे करतात. यामुळे त्यांची दुटप्पी धोरणे कशी असतात, हे या महाराष्ट्राने पाहिलंय.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा