जळगाव, 26 जुलै : राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिक्षकांना अशापद्धतीने धमकविणे चुकीचे असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. मंत्री पाटील यांनी अनिल देशमुखांबाबत जळगावचे तत्कालीन एसपी डॉ. प्रविण मुंढे यांनी दिलेल्या जबाबाबत ही प्रतिक्रिया दिली. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक बैठक काल पार पडली. दरम्यान, या बैठकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? –
गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावचे तत्कालीन एसपी डॉ. प्रविण मुंढे यांच्यावर दबाव आणला होता, असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारला. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, स्वतः एसपी प्रविण मुंढे यांनी कबुल केलेले आहे आणि त्याबाबत त्यांनी तसा जबाब देखील नोंदविला आहे. यामुळे याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिक्षकांना अशापद्धतीने धमकविणे चुकीचे असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. म्हणाले
नेमकं काय आहे प्रकरण? –
जळगावमधील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर भाजपचे गिरीश महाजन संचालक होते. त्या शिक्षण संस्थेचा ताबा कुणाकडे असावा, यावरुन वाद सुरू झाला होता. यामध्ये गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप होता. या प्रकरणात गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन तपास केला होता. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला होता, असा दावा एसपी मुंढे यांनी सीबीआयकडे केल्याची माहिती समोर आली आहे.