नाशिक, 15 फेब्रुवारी : गावातला जरी सरपंच झाला तरी दोन हात मोकळा करून चालतात. मात्र, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्यासारखा इतका साधा माणूस मी माझ्या 25 वर्षांच्या राजकारणात कधीही पाहिला नाही. आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झालेत पण त्यांच्यासारखा मुख्यमंत्री मी कधीही पाहिला नाही, असे विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नाशिकमध्ये काल 14 फेब्रुवारी रोजी शिवसेनाच्यावतीने आयोजित केलेल्या आभार यात्रेत ते बोलत होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांसाठी काम केलंय, असेही मंत्री पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
निवडणुकीत निवडून आल्यानंतर जनतेत जाऊन आभार मानण्याची ही पहिली पद्धत जर कोणी सुरू केली असेल तर ती शिंदे साहेब तुम्ही सुरू केलीय आणि लोकांचे तुम्ही आभार मानताएत. हे लोकं तुम्हाला विसरू शकत नाहीत. आणि अशापद्धतीने आभार मानण्याचा महाराष्ट्र आणि देशातील हा एकमेव कार्यक्रम असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, सरकारमध्ये असताना महिला सक्षमीकरणाच्या घोषणा अंमलात आणण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
खरी शिवसेना आमचीच! –
आमचा शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरल्याचे आरोप तुम्ही आमच्यावर करतात. खरंतर, बाळासाहेबांचा विचार संपविण्याचे काम तुम्ही केलंय. मात्र, आम्ही विचार तेवत ठेवले. संघटना संपतात-विचार संपतात. पण, विचार संपत नाहीत. म्हणून हिंदुह्रदयसम्राटांच्या त्या विचारांच्या भरवस्यावर जो भगाव आमच्या हातात दिलाय. तो भगाव तेवत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. यामुळे खरी शिवसेना आमचीच असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. यावेळी गुलाबरावांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, नेत्या मीनाताई कांबळी, प्रवक्त्या प्रा.ज्योती वाघमारे तसेच नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत