जळगाव, 23 सप्टेंबर : महायुतीच्या सरकारमधील कॅबीनेट मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटील हे त्यांच्या भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. असे असताना त्यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शना दरम्यान जोरदार केलेल्या भाषणामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या भाषणांत त्यांनी गुवाहटी जाण्याचा देखील किस्सा सांगितलाय.
गुलाबरावांनी सांगितला गुवाहाटी जाण्याचा किस्सा –
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, माझ्यावर टीका झाली की मी गद्दार आहे. मात्र, मी नंबर 33 ला गेलो. माझ्या अगोदर सर्व चालले गेले. मी उद्धव साहेबांकडे गेलो. त्यांना सांगितले की, वाफीपर्यंत एकनाथ शिंदे साहेब 13 आमदारसोबत घेऊन निघाले आहेत. आपण त्यांना बोलवू शकतो. त्यांना थांबवू शकतो. मात्र, तिथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, काही गरज नाही. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही जा. अन् फिर हम भी निकल पडे झाडी और डोंगर देखने के लिए. अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहटी जाण्याचा किस्सा सांगितला. दरम्यान, सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर विविध विकासकामे केल्याचा दावाही मंत्री पाटील यांनी केला.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://youtube.com/shorts/HkipfJdbxiE?si=iwQPOwi3426PmRuc
मंत्री पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना –
मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भाषणाच्या खास शैलीत जळगाव ग्रामीणचे राजकीय मांडत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. विरोधकांचा तुम्हीच प्रचार कराताएत. आपण आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला चुकीचे बोलू नका. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये निवडून आला नाहीत तरी तुम्ही शरद पवार यांच्यावर टीका करताएत, हे देखील चुकीचे आहे. म्हणून शरद पवार साहेबांवर टीका करू नका, असे आवाहन मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. मी माझ्या लेव्हलवरच्या माणसावर टीका केली पाहिजे, असा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे, असेही यावेळी पाटील म्हणाले.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत