• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळ्यात आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते नाभिक समाजातील बांधवांना सलुन किटचे वितरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 3, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळ्यात आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते नाभिक समाजातील बांधवांना सलुन किटचे वितरण

संदीप पाटील, प्रतिनिधी

पारोळा, 3 ऑक्टोबर : पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील तसेच दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोल पाटील यांच्या हस्ते नाभिक समाज बांधवांना सलुन किट वितरण करण्यात आले. पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्यातील नाभिक समाज एकत्र यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार चिमणराव पाटील यांनी भुतकाळापासुन समाजात नाभिक समाजाचे योगदान व महत्वाची मांडणी करत जुन्या रूढी-परंपरेपासुन नाभिक समाजाच्या कार्याचे विश्लेषण केले. आजवर गेल्या 50 वर्षांहुन अधिकच्या राजकारणात मी कधी समाज ह्या विषयावर राजकारण केले नाही. प्रत्येक व्यकी हा माझा समाज व माझा परिवार असल्याचीच माझी भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

अमोल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, सर्वप्रथम नाभिक समाजाचे आराध्यदैवत श्री संत सेना महाराज यांच्या जयघोषाणे सुरूवात करत, सर्वपित्री अमावस्या असुन आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असल्याबद्दल आभार मानले. किट वाटप ही संकल्पना वितरण ह्याच उद्देशाने केलेले आयोजन नाही, यातुन एरंडोल, पारोळा व भडगांव विधानसभा मतदारसंघातुन हा समाज संघटीत होऊन हा समाज एकवटावा हेच ह्या कार्यक्रमा मागील मुख्य उद्देश होता. यासह पारोळा शहरातील नाभिक समाज बांधवांना हक्काचे व्यासपीठ म्हणुन उपलब्ध करून दिलेल्या सामाजिक सभागृहसह मतदारसंघातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा मांडला.

पारोळा नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष दिनेश अहिरराव, उत्राण येथील प्रकाश कुवर, भडगांव येथील संजय पवार, पारोळा सिडबॉल कॕम्पेनचे प्रमुख राहुल निकम, फरकांडे येथील राजेंद्र ठाकरे यांनी आपल्या मनोगतातुन आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे आभार मानत, आपले समाजातील कार्य, व्यवसाय यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, आमचा नाभिक समाजाची आजवर कुणीही दखल घेतली नव्हती. आज आमचा समाजाची दखल घेवुन आमचा सन्मान केल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे आभार मानत एरंडोल विधानसभा मतदारसंघा विविध गावांतील नाभिक समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष कुणाल महाजन यांनी केले. प्रास्ताविक मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील यांनी केले. यावेळी फरकांडे येथील राजेंद्र ठाकरे सर यांनी आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचा सत्कार करत शिवसेनेत स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती –
यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, एरंडोल पं.स.मा.सभापती अनिल महाजन, बापु पाटील, एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, एरंडोल तालुका संघटक संभाआबा पाटील, पळासखेडे येथील सुभाष पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, धरणगांव बाजार समिती उपसभापती किरण पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक रावसाहेब भोसले, पारोळा शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक भैय्या पाटील, सचिन पाटील, साहेबराव पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखाराम चौधरी, नथाबापु पाटील, देवगांव सरपंच समिर पाटील, शेतकी संघाचे संचालक प्रकाश पाटील, एरंडोल युवासेना शहरप्रमुख कृष्णा ओतारी यांचेसह पारोळा, एरंडोल व भडगांव शहरासह तालुक्यातील नाभिक समाज पंच मंडळ, युवक मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, नाभिक समाज बांधव, पत्रकार, विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावांचा विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महिला सुरक्षेवर परखड मत, जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla chimanrao patilparola taluka latest newssalon kit distributionsalon kit distribution in parolasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page